admin@seekamotors.com +91 9765579911 / +91 9168655911

Latest News

जळगाव दि. २२ प्रतिनिधी 
नशिराबाद येथील सीका ई मोटर्स च्या जळगाव शहरातील नवी पेठेतील शो रूमचा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.
श्री साईराम प्लास्टिक अँड  इरिगेशनचे संचालक प्रमोददादा पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी कुश श्रीराम पाटील,  कु.देवांशू पाटील, सिनीअर मॅनेजर अनंत बागुल, असिस्टंट मॅनेजर सुरज कोलते, सीका ई मोटर्सचे मॅनेजर अविनाश पाटील, लेखापाल नितेश पाटील, अतुल भंगाळे, लक्ष्मण धनगर, अक्षय पाटील, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
 
शोरूमला ग्रहकांचा प्रतिसाद 
 सीका ई मोटर्स चे जळगाव शहरात प्रथमच नवी पेठेतील बँक स्ट्रिट मार्गावर शोरूम तयार करण्यात आले आहे. यात smak, vatsal 250,sflash 250 या ई बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुरूषांसह महिला, महाविदयालयीन युवक युवती यांच्यासाठी ही ई बाईक उपयुक्त आहे. वाढत्या पेट्रोल बाईक / स्कुटरला सीका ई बाईक उत्तम पर्याय आहे. यातील smak या बाईकसाठी आरटीओ नोंदणीसह विमा मिळणार आहे. तर  vatsal250,sflash250 या दोन्ही बाईकला वाहन परवाना, आरटीओ नोंदणीची गरज नाही.अक्षय तृतीयेस शोरुमच्या शुभारंभाप्रसंगी चार वाहनांची विक्रीची नोंदणी करण्यात आली तर एका ई बाईकचे  संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते  ग्राहकाला वितरणही यावेळी करण्यात आले.